खडसेंनी आवळला नाराजीचा सूर

eknath-khadse
मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विधी मंडळाच्या नेत्याच्या निवडीला काही मिनिटांचा अवधी उरला असताना पक्षनेतृत्वावर नाराज झाले असून त्यांना अपेक्षित मंत्रीपद मिळत नसल्याने ते रूसले आहेत. त्याचबरोबर आपणही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे सांगत आमदारांच्या बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असेल, असे देखील खडसे यांनी म्हटले आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात भाजपाची सत्ता स्थापन होणार असल्याने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला असून त्यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांनी लॉबिंगही देखील केले होते. मात्र, पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर किमान वजनदार मंत्रीपद मिळेल, अशी खडसे यांना अपेक्षा होती. मात्र, अपेक्षित मंत्रीपद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने खडसेंनी नाराजीचा सूर आवळला आहे. विधीमंडळ नेता निवडीची लगबग सुरू असतानाच खडसे यांनी नाराजीचा सूर आवळल्याने भाजपाचे नेते राजीवप्रताप रूडी यांनी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले.

Leave a Comment