मशिदीत बलात्कार; मौलविला २० वर्षांची शिक्षा

rape
काबुल (अफगाणिस्तान) – ११ वर्षीय मुलीवर मशिदीत बलात्कार केल्याप्रकरणी अफगाणिस्तानातील मौलविला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून कौटुंबिक दबावानंतरही अल्पवयीन मुलीने न्यायालयात मौलविला ओळखले. त्यानंतर त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली.

नातलगच या पीडित मुलीला ठार मारण्याची धमकी देत असल्यामुळे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पीडित मुलीला सुरक्षेच्या कारणास्तव वुमन शेल्टरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

यासंदर्भात वुमन फॉर अफगान वुमनच्या प्रमुख हसिना सरवारी यांनी सांगितले, की मौलविचे नाव महंमद अमीनुल्लाह बरेज असे असून त्याने मुलीवर मशिदीतच बलात्कार केला होता. सुरवातीला हे प्रकरण लपवण्याचा मुलीने प्रयत्न केला. पण प्रकृती खराब झाल्याने तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी मौलविला अटक केली. त्यानंतर मुलीला काबुलला आणण्यात आले. तिला वुमन शेल्टरमध्ये ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment