फुटबॉल खेळाडूची गोळ्या झाडून हत्या

miymi
जोहान्सबर्ग – अज्ञात मारेकर्‍यांनी साऊथ अफ्रिकन फुटबॉल टीमचा कर्णधार सेंजो मिईवोची गोळ्या घालून हत्या केली असून रविवारी रात्री तीन शस्त्रधारी सेंजोच्या वॉसलुरुस येथील राहात्या घरात घुसले व त्याच्यावर गोळीबार करुन फरार झाले. सेंजोला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

पोलिस सेंजोच्या हत्येचे कारण काय, याचा तपास करत असून जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याच्या घराजवळ सात लोक होते. हल्लेखोरांनी सेंजोशिवाय इतर कोणालाही हात लावला नाही, त्यामुळे त्यांचा उद्देश सेंजोची हत्या करणे एवढाच होता, असा तपास यंत्रणेचा कयास आहे. हल्लेखोर तीन असण्याची शक्यता आहे. दोन घरात घुसले आणि एक बाहेर उभा होता. या पार्श्वभूमीवर हल्लेखोरांची माहिती देणार्‍यांना पोलिसांनी १४ हजार डॉलर रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.

Leave a Comment