
मुंबई – विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरल्यानंतर प्रचारादरम्यान भाजपला लक्ष्य केलेल्या शिवसेनेने सोमवारी भाजपसंदर्भातील आपली भूमिका अधिक मवाळ करत, भाजपने मुख्यमंत्री म्हणून निवडलेल्या कोणत्याही नेत्यास पाठिंबा देण्याची घोषणा केली. जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रास पुढे घेऊन जाणार्या कुठल्याही उमेदवारास शिवसेनेचा पाठिंबा असेल,‘‘ असे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये म्हटले आहे. ‘‘अनुभव व आवाका पाहता गडकरी हे उजवे असले; तर दुसरीकडे फडणवीस यांना राज्यकाराभाराचा अनुभव नाही. यासंदर्भातील अंतिम निर्णय हा भाजपच्या दिल्लीमधील उच्चस्तरीय नेतृत्वातर्फेच घेतला जाईल. यामुळे यासंदर्भात राज्यामधील नेत्यांनी विचारविनिमय करण्याची आवश्यकता नाही. ,‘‘ अशा आशयाची भूमिका शिवसेनेने व्यक्त केली आहे.
