
पुणे – पंचशील ग्रुपमध्ये शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचे शेअर्स असल्याचा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या या आरोपामुळे चर्चेत आलेल्या पुण्यातील पंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांनी त्यांच्याच ‘डबल ट्री हिल्टन ’ या चिंचवडमधील हॉटेलमध्ये दुपारी दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
पंचशील ग्रुपच्या चेअरमनने केली आत्महत्या
चोरडियांसारख्या मोठ्या व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने, खळबळ उडाली असून चोरडिया यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सुप्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक ईश्वरदास चोरडिया यांचे पुत्र तर अभय चोरडिया यांचे बंधू अजय चोरडिया आहेत.
