चांदिवलीत क्लिक मिक्सन स्टुडिओला भीषण आग

fire
मुंबई – शुक्रवारी रात्री मुंबईतील चांदिवली येथील क्लिक मिक्सन स्टुडिओला भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र आग लागल्यानंतर काही वेळातच स्टुडिओमधील सर्वांना बाहेर काढण्यात आल्यामुळे जीवितहानी झाली नाही.

रात्री दहाच्या सुमारास साकीनाक्याजवळच्या क्लिक मिक्सन स्टुडिओत आग लागली. काही मिनिटांतच आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे परिसरात हाहाकार उडाला. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे आठ बंब आणि सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले. बालाजी टेलिफिल्मच्या अनेक मालिकांचे शूटिंग या स्टुडिओमध्ये होते. स्टुडिओमागे असलेल्या लाकडी कचरा आणि सेटमध्ये फटाक्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a Comment