खाती रिकामी करा, स्विस बँकेचे आदेश

swiss
मुंबई – भारतीयाच्या काळा पैशाच्या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली असून स्विस बॅंकांनी चार भारतीयांना खाती ‍रिकामी करा असे आदेश दिले आहेत. या खातेदारांमध्ये तीन मुंबई तर एक दिल्लीतील रहिवासी असून ३१ डिसेंबर ही या चौघांना रकम काढून घेण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे.

बॅंक व्यवस्थापनाद्वारा गेल्या आठवड्यात गोपनीय खाते बंद करण्याचे आदेश दिले होते. यात एका खातेदाराला ३० ऑक्टोबरपर्यंत खाते बंद करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच एका खातेदाराला खात्यावरील रकमेवरील कर भरल्याचा पुरावा सादर करण्यास सांगितले आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी हे खाते स्विस बॅंकांमध्ये उघडण्यात आले होते. भारतीय खातेदारांना हे फोन कॉल ज्युलियस बेयर, क्रेडिट सुइस आणि यूबीएस बॅंकेद्वारा करण्‍यात आले आहेत.

Leave a Comment