एकदिवसीय सामन्यात ठोकले २६२ रन

cricket
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेम्स टुल याने गेल्या काही दिवसांपूर्वी वन डे क्लब क्रिकेटमध्ये ३४१ रन बनवून प्रसिद्धी झोतात आला होता. आता राजस्थानच्या आदित्य गढवाल याने एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक लगावून इतिहास रचला आहे.

आदित्य गढवाल राजस्थानचा खेळाडू असून त्याने मध्यक्षेत्र विनू मंकड अंडर-१९ क्रिकेट टुर्नामेंटमध्ये रेल्वे विरुद्ध खेळताना २६३ रन्सची शानदार खेळी केली. आदित्यने या खेळीत २२ चौकार आमि १८ षटकार लगावले. आदित्यच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने ४१३ रन्सचा डोंगर रचला. याला प्रत्युत्तर देताना रेल्वेचा संघ ४२.२ षटकात १४२ धावांवर गारद झाला. राजस्थानने २७१ रन्सने विजय मिळविला.