झिओमी मोबाईल फोनविरोधात भारताच्या हवाई दलाने दिला धोक्याचा इशारा

xaiomi
नवी दिल्ली – चीनमधील झिओमी कंपनीने स्वस्त दरात चांगले फिचर्स असलेले मोबाईल फोन देऊन भारतात दमदार प्रवेश केला असला तरी भारताच्या हवाई दलाने या चिनी मोबाईल फोनविरोधात धोक्याचा इशारा दिला असून या मोबाईल फोनमधील महत्त्वपूर्ण माहिती चीनच्या सर्व्हरमध्ये जात असल्याने हवाई दलातील अधिका-यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी चिनी फोन वापरु नये अशी सूचना हवाई दलाने केली आहे.

यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत झिओमी या चिनी मोबाईल कंपनीने पाऊल ठेवले व अवघ्या काही महिन्यांमध्येच या फोनला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या फोनमधील महत्त्वपूर्ण डाटा चीनच्या सर्व्हरमध्ये जात असल्याचे हवाई दलाचे म्हणणे आहे. ‘एका ख्यातनाम सेक्युरिटी सॉल्यूशन कंपनीने झिओमी रेडमी १s हा मोबाईल तपासून बघितला. या फोनमध्ये सेव्ह केलेले नाव आणि नंबर तसेच एसएमएस चीनमधील अज्ञात स्थळी लावलेल्या सर्व्हरमध्ये सेव्ह केला जात असल्याचे समोर आले आहे असे हवाई दलाचे म्हणणे आहे. याशिवाय लोकेशन शेरींग सुविधेच्या आधारे संरक्षण, संशोधन आणि सरकारी क्षेत्रातील अधिका-यांवर नजर ठेवणे शक्य आहे असा इशाराही हवाई दलाने दिला आहे.

Leave a Comment