महाराष्ट्र सदन घोटाळ्याची होणार चौकशी

maharashtra-sadan
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून खुल्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविल्यामुळे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आता भुजबळांची चौकशी एसीबीकडून होण्याची शक्यता बळावली आहे.

बुधवारी गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि मुंबईतील सरकारी दोन इमारतींच्या बांधकामाबाबत, भुजबळांची भूमिका काय, याची चौकशी करण्यास बजावले आहे.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १२३ जागा मिळवल्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला न मागता बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार उघड होऊ नये, म्हणूनच हा पाठिंबा दिल्याचा आरोप, सर्वच पक्षांनी केला आहे.

Leave a Comment