पाकिस्तानातील हिंदूंनी केली दिवाळीनिमित्त सरकारी सुट्टी देण्याची मागणी

diwali2
इस्लामाबाद – पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या हिंदू कुटुंबांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडे दिवाळीनिमित्त देशात सरकारी सुटी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. आम्ही देशभक्त पाकिस्तानी हिंदू आहोत. त्यामुळे ही सुटी आमचा अधिकार आहे, असे हिंदू कौन्सिलचे सदस्य व सत्ताधारी पीएमएलचे खासदार रमेशकुमार वंकवानी यांनी म्हटले आहे. हिंदू सण-उत्सव साजरे करण्यासाठी सुटी मिळणे हा घटनात्मक अधिकार असून हा मुद्दा आपण संसदेत जोरकसपणे मांडणार असल्याचे वंकवानी म्हणाले. या देशात अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडण्यासाठी एकही राजकीय पक्ष गांभीर्याने विचार करत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

Leave a Comment