टेरी वॉल्श यांनी मागे घेतला राजीनामा

terry
नवी दिल्ली – भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदाचा काल राजीनामा देणा-या टेरी वॉल्श यांनी बुधवारी राजीनामा मागे घेतला असून क्रीडा विभागातील काही वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला.

वॉल्श यांनी काल भारतीय क्रीडा प्राधिकारणासोबत (साई) मानधनावरून झालेल्या वादामुळे पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी क्रीडा संघटनेच्या कार्यपद्धतीवर देखील टीका केली होती. ‘साई’ची कार्यपद्धती भारतीय हॉकी आणि हॉकीपटूंच्या हिताची नसल्याचे वॉल्श म्हणाले होते.

त्यानंतर यासंदर्भात क्रीडा मंत्रालयाने साईकडे अहवाल मागवला होता. बुधवारी वॉल्श साईचे आणि क्रीडा मंत्री यांच्याशी चर्चा केली. या चर्चानंतर वॉल्श यांच्याशी नव्याने करार केला जाणार आहे.

Leave a Comment