ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे दोन दिवस अंधारात उरण

fire1
उरण – ऐन दिवाळीत उरणच्या नागरिकांची दिवाळी अंधारात साजरी होणार आहे. कारण उरण तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मोठी आग लागली. त्यामुळे उरणसह तालुक्यातील गावांमध्ये वीजपुरवठा बंद आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा वीज खंडीत झाला आहे. दोन दिवस वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे समजते.

उरण तालुक्यातल्या जीटीएस प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली आहे. त्यामुऴे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गेल्या तीन ते चार तासांपासून अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अचानक लागलेल्या आगीमुळे दिवाळीचा पहिलाच दिवस उरणकरांना वीजेविणा साजरा करावा लागत आहे.

Leave a Comment