गटप्रमुखाच्या हत्ये प्रकरणी पाचजणांना अटक

murder1
\मुंबई – पोलिसांनी मीरा रोड येथून पाच जणांना दिंडोशीमधील शिवसेना गटप्रमुखाच्या हत्येप्रकरणी अटक केली असून काल रात्री शिवसेनेचे गटप्रमुख रमेश जाधव यांच्या घरात घुसून काही जणांनी त्यांची निर्घुण हत्या केली होती.

परिसरातील एका महिलेची छेड काढल्याचा जाब जाधव यांनी काही जणांना विचारला. त्या रागातून आरोपींनी जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले यात जाधव यांचा मृत्यू झाला.

दिंडोशी परिसरात जाधव यांची हत्या झाल्याची बातमी पसरताच तणाव निर्माण झाला होता. पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात आला होता. परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनीही घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि मीरारोड येथून पाचजणांना अटक करण्यात आली.

Leave a Comment