अमेरिकेने केला मलालाचा गौरव

malala
वॉशिंग्टन : अमेरिकेने लिबर्टी पदकाने नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईला गौरविले असून अमेरिका दरवर्षी कर्तृत्ववान पुरूष आणि महिलांना हे पदक देऊन सन्मानित करीत असते.

अमेरिकेच्या राष्ट्रीय संविधान केंद्राने प्रतिकुल परिस्थितीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल आणि मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविल्याने तिला लिबर्टी पदकाने गौरविण्यात आल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये महिलांचे शिक्षण आणि मुलांच्या हक्कासाठी लढणारी मलाला तिला मिळालेल्या नोबेल पुरस्काराचे एक लाख रूपयांची रक्कम पाकिस्तानमधील शिक्षणासाठी खर्च करणार आहे. ती सध्या ब्रिटनमध्ये राहत असून, पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण हक्कासाठी तिने चळवळ उभी केली आहे.

Leave a Comment