भाजप शिवसेनेला कोणताही प्रस्ताव पाठविणार नाही : माथुर

om-mathur
मुंबई – भाजपाकडून त्यांना कोणताही प्रस्ताव शिवसेनेला पाठविणार नाही पण शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास त्याचा विचार केला जाईल अशी भूमिका भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर यांनी घेतली असून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने सर्व तयारी केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा देऊ केल्यापासून भाजपने शिवसेनेवर दबाव वाढविण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर शिवसेनेने सुद्धा बिनशर्त पाठिंबा द्यावा, अशीच भाजपची अपेक्षा आहे. मात्र, अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या विकासाचे वचन दिल्यास पाठिंबा देऊ, असे शिवसेनेडून सांगण्यात आले आहे. त्यास भाजपाकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. उलट दिवसेंदिवस भाजपची भूमिका ताठरपणाची होत असल्याचे दिसते. ओम माथूर यांच्या वक्तव्यावरूनही तेच स्पष्ट होत आहे. अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचा व़िश्वासही माथूर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment