स्पाईसजेट घडविणार फक्त ३५१ रुपयांत हवाई सफर

spice-jet
नवी दिल्ली – खास दिवाळीनिमित्त आपल्या प्रवाशांना आकर्षिक करण्यासाठी स्पाइसजेट एअरवेज कंपनीने धमाका ऑफर दिली असून या ऑफरनुसार प्रवाशांना फक्त ३५१ रुपयांच्या बेसफेअरमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व करसहीत एका तिकिटाची किमत ८९९ रुपये इतकी आहे.

एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१४ दरम्यान या ऑफरनुसार प्रवास करता येईल. तसेच तिकिट बुक करण्याची अंतिम तारीख २६ ऑक्टोबर २०१४ ही असेल. ही ऑफर फक्त बंगलुरु, चेन्नई आणि कोची येथून प्रवास सुरु करणार्‍या प्रवाशांसाठी आहे. स्पाइसजेट एअरवेजच्या विमानाचा बेसफेअर फक्त ३५१ आहे. करसहीत हे भाडे ८९९ रुपये आहे. ८९९ रुपये तिकिटाचे दर सगळ्यात कमी अंतराच्या रुटसाठी असून वेगवेगळ्या रूटसाठी वेगळे तिकिट दर असतील.

Leave a Comment