
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची सोमवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड
तत्पूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे बारामती विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजित पवार राज्यात सर्वाधिक मताच्या फरकांनी निवडून आलेले उमेदवार ठरले.
अजित पवार यांनी तब्बल ८९ हजार ६३३ मतांच्या फरकाने विजयश्री खेचून आणला. त्यांनी भाजपच्या बाळासाहेब गावंडे यांचा पराभव केला. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अजित पवार यांनी आघाडी घेतलेली दिसली. आठव्या फेरीअखेरीस ते ५० हजार २८१ मतांनी आघाडीवर होते. दुपारी १२.४५च्या सुमारास त्यांची ही आघाडी तब्बल ८० हजार मतांच्या फरकाने दिसून आली.
