सात अपक्ष आमदार देणार भाजपला साथ

vidhansabha
मुंबई : भाजपाने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्यानंतर आठ अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याची माहिती मिळाली आहे.

भोसरीतून जिंकलेले महेश भोसरे आणि पाथरीचे आ. मोहन फड हे देखील भाजपसोबत जातील, अशी शक्यता असून त्यांचा निर्णय झालेला नाही. अमरावतीतील बच्चू कडू गेल्यावेळीही अपक्षच जिंकले होते आणि त्यांनी काँग्रेसला साथ दिली होती. सत्तापक्षाला साथ देण्याचा त्यांच्याबाबतचा अनुभव पाहता यावेळीही ते तसाच निर्णय घेऊ शकतात.

त्याच बरोबर बडनेराचे आमदार रवि राणा हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ते राजकीय गुरु मानतात. राजकीय गुरूने आधीच भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे. कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड हेही सत्तापक्षाची कास धरतील, असे मानले जाते. अमळनेरमधून जिंकलेले अपक्ष आमदार शिरीश चौधरी भाजपासोबत जातील हे जवळपास स्पष्ट आहे. ते माजी मंत्री आणि आता भाजपाकडून नंदुरबारमध्ये निवडून आलेले डॉ.विजयकुमार गावित यांचे अत्यंत जवळचे आहेत.

Leave a Comment