१.७ लाख फुकट्या प्रवाशांकडून ६.४४ कोटींची दंडवसुली

wr
मुंबई – विनातिकीट प्रवास करणा-या फुकट्या प्रवाशांची पश्चिम रेल्वे प्रशासनाने चांगलीच अद्दल घडवली आहे. सप्टेंबर महिन्यात पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियमित तिकीट तपासणी मोहिमेत सामानांचे आरक्षण न केलेल्या प्रवाशांसाह १.७ लाख फुकटे आढळले होते. दरम्यान पश्चिम रेल्वेने या प्रवाशांकडून ६.४४ कोटी रुपयांची दंडवसूली केली आहे. ही वसूली मागील वर्षाच्या तुलनेने २७.६७ टक्क्याहून जास्त आहे. या महिन्यात तिकीट आरक्षणातील बेकायदेशीर हस्तांतरणाची १५० प्रकरणे आढळून आली. ज्याची एकूण रक्कम १,४०,२९५ होती. यामध्ये १,५४५ भिकारी, अनधिकृत फेरीवाले आणि इतर ११२ व्यक्तींना तुरुंगात पाठवण्यात आले. सप्टेंबर २०१४ या कालावधीत २०० दलाल आणि सामाजिक घटका विरुद्ध कारवाई करण्यात आली. सप्टेंबर महिन्यातील या तिकीट तपासणी मोहिमेच्या परिणामा स्वरुप एकूम १९५ व्यक्तींना अटक करुन रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत दंड ठोठावण्यात आले आहे.

Leave a Comment