
सिरीया आणि इराकमधील कांही भागावर कब्जा करून स्थापण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटने त्यांचे स्वतःचे वायूदल उभारणीचे काम हाती घेतले असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे इराकी पायलट या दहशतवाद्यांना पायलटचे प्रशिक्षण देत आहेत. सिरीया युद्दावर लक्ष ठेवून असलेल्या मानवाधिकार संघटनेने हे वृत्त प्रत्यक्षदर्शीच्या आधाराने दिले आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना विमाने उडविण्याचे प्रशिक्षण घेण्याची संधी प्रथमच मिळाली आहे.
इसिस करतेय स्वतःचे वायूदल तयार
इसिसच्या ताब्यात सध्या तीन विमाने आहेत. अल जर्राह उग्रवादी संघटनेच्या सैनिकांनी विमानतळांवर विमाने उडविण्याचे प्रशिक्षण यापूर्वीच घेतले आहे. या विमानांचा वापर लढाईत केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे मात्र या विमानांवर शस्त्रे बसविली गेली आहेत वा नाही याची माहिती अद्यापी मिळू शकलेली नाही.
