फियाटची अॅव्हेंच्युरा २० आकटोबरला येणार

fiat
दिल्ली- फियाटच्या अॅव्हेंच्युराचा भारतातील मार्केट लाँच २० आक्टोबरला होत असून या गाडीचे प्री बुकींग गेल्या माहिन्यापासूनच देशभरातील फियाटच्या डिलर्सकडे सुरू झाले होते. हे नवे मॉडेल प्युंटो इव्होवर आधारित आहे. गाडीच्या डिझाईनमध्ये अनेक आकर्षक बदल केले गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कारचा ग्राऊंड किलअरन्स वाढविला गेला आहे तसेच एक्स्टर्नल स्पेअर व्हील्स या कारला दिली जाणार आहेत.

पेट्रोल आणि डिझेल मध्ये ही कार उपलब्ध आहे. पेट्रोलची अॅक्टीव्ह आणि डायनॅमिक अशी दोन व्हेरिएंट आहेत तर डिझेलची अॅक्टीव्ह, डायनॅमिक आणि इमोशन अशी तीन व्हेरिएंट आहेत. पेट्रोलसाठी या गाडीने १४.४ किमी पर लिटर तर डिझेलसाठी २०.५ पर लिटर अॅव्हरेज एआरएआय च्या चाचण्यांत दिले असल्याचे सांगितले जात आहे. या गाडीची किंमत ६ ते ८ लाख रूपयांदरम्यान आहे.

Leave a Comment