मुंबई पायाभूत सुविधा विकासाबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार- राज्यपाल

vidyasagar-rao
मुंबई – ‘बॉम्बे फर्स्ट’ या मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या बौध्दिक गटाच्या सदस्यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. मुंबई महानगर क्षेत्रापुढील आगामी चाळीस वर्षातील समस्या आणि आव्हाने यावर एक विस्तृत सादरीकरण केले. सन २०५२ साली मुंबई महानगरातील पायाभुत सुविधांची स्थिती काय असेल याचा विचार करुन मुंबईच्या विकासासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, याबद्ल हे सादरीकरण होते. मुंबईतील पायाभूत सुविधांच्‍या समस्यांबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करु असे यावेळी राज्यपालांनी सांगितले आहे.

Leave a Comment