एजाज बट यांची आफ्रिदीवर टिका

afridi
कराची – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष एजाज बट यांनी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीवर टिका केली आहे. बट यांनी सांगितले की, आफ्रिदीला आंतरराष्ट्रीय संघात राहण्याचा हक्क नाही. पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी लाहौर गद्दाफी स्टेडियममध्ये झालेल्या मुलाखतीनंतर बट यांनी सांगितले की, हे माझे वैयक्तिक मत आहे की, आफ्रिदीला संघात स्थान न देण्यात यावे. जर त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर, त्याला संघात राहण्याचा हक्क नाही. मात्र, हा निर्णय निवडकर्त्यांना घ्यावा लागेल. जर त्यांना वाटत असेल की, आफ्रिदी अजूनही संघासाठी आपले योगदान देऊ शकतो तर, त्यांनी त्यांचा निर्णय स्वत:च घ्यायचा आहे. माजी कसोटी क्रिकेटपटू बट २००८ ते २०११ पर्यंत पीसीबीचे अध्यक्ष होते, त्यांनी २०११ मध्ये आफ्रिदीला अनुशासित कारणांमुळे टी २० आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविले होते. बट यांनी हे देखील सांगितले की, जर शहरयार यांच्या जागी अन्य कोणी पीसीबीच्या अध्यक्षपदी असते तर, त्यांनी आफ्रिदीला कर्णधार म्हणून बाचाबाची करण्यामुळे काढून टाकले असते. बट पुढे म्हणाले की, शहरयार सज्जन व्यक्ती आहेत आणि मी त्यांना सांगितले आहे की, मिसबाह उल हकचा फॉर्म खराब असला तरी, विश्वचषकापर्यंत त्याला कर्णधारपदावरून हटविण्याची गरज नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Leave a Comment