मध्य विभाग कर्णधारपदाची धुरा पीयूष चावलाकडे

piyush-chawla
नागपूर – उत्तर विभागाविरुद्ध दुलिप करंडक स्पर्धेच्या उपांत्य लढतीसाठी मध्य विभाग संघाचा कर्णधार व संघ जाहीर करण्यात आला. संघाच्या कर्णधारपदी उत्तर प्रदेशच्या पीयूष चावलाची निवड झाली. मोहाली येथे २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ही लढत होणार आहे. मध्य विभाग संघात विदर्भाचा सलामीवीर फैज फजल, शलभ श्रीवास्तव व श्रीकांत वाघ यांची निवड करण्यात आली आहे. मध्य विभाग संघात पीयूष पाटील (कर्णधार), अमित मिश्रा, आर. पी. सिंग, अली मुर्तझा, महेश रावत, अरिंदम घोष, के. अनुक्रीत सिंग, फैज फजल, शलभ श्रीवास्तव, श्रीकांत वाघस, विनीत सक्सेना, रॉबीन बिश्त, अशोक मेनारिया, मोहनीश मिश्रा जलज सक्सेना यांचा समावेश आहे.

Leave a Comment