निवडणुकीचा फटका मुंबई विद्यापीठाला

mumbai-university
मुंबई – विधानसभा निवडणुकांमुळे परीक्षेच्या वेळपत्रकात बदल करण्यात आल्याने यंदा मुंबई विद्यापीठातील विद्यार्थांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कटोती करत येणार आहे, मुंबई विद्यापीठाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ५ नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठी विद्यापीठाने २० ऑक्टोबरपासून सुरू होणारी दिवाळी सुट्टी कमी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियोजनानुसार १८ ऑक्टोबरपासून सुरू होणारी दिवाळीची सुट्टी ३ नोव्हेंबरपर्यंतच असेल. त्यानंतर कमी केलेल्या सात सुट्ट्या नाताळच्या सुट्टीला जोडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नाताळची सुटी एक जानेवारीला संपल्यानंतर ही सुट्टी ८ जानेवारीपर्यंत असणार आहे.यंदा विधानसभा निवडणुकीमुळे आम्हाला परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलावे लागले. म्हणूनच नव्या नियोजनात आम्ही या सुट्ट्या दोन सत्रात विभागल्या आहेत. त्यांची सर्व माहिती कॉलेजांना देण्यात आली असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या एका अॅकेडमिक कौन्सिलच्या सदस्याने सांगितले.

Leave a Comment