पाकिस्तानी वायुसेनेच्या हल्ल्यात २१ अतिरेकी ठार

air-force
इस्लामाबाद – पाकिस्तानी वायुसेनेने आज अफगाण सीमेनजीक असलेल्या एका आदिवासीबहूल प्रांतात अतिरेकी तळांना लक्ष्य केल्याचे सूत्रांकडून समजते. पाकिस्तानी वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात २१ अतिरेकी मारले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. वायुसेनेने आज सकाळी तिराह खो-यातील आकाखेळ आणि सिपाह परिसरातील अतिरेकी तळांना लक्ष्य केले आहे. वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २१ अतिरेकी मारले गेले आहेत. तर त्यांची पाच तळे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. एका आत्मघातकी हल्लेखोराने शांती समितीच्या बैठकीला लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानी वायुसेनेने हे हल्ले केले आहेत. सुरक्षा दलांनी सध्या शकास परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. या परिसरात तालिबान आणि इतर अतिरेकी संघटनांनी आश्रय घेतल्याचा संशय सुरक्षा दलांना आहे.

Leave a Comment