सेलिब्रिटीनीही बजावला मतदानाचा हक्क

vote
मुंबई – लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्याचा तो निर्णायक क्षण अखेर आज आला. लोकसभेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आश लावून बसलेला मतदारराजा पहाटे सात वाजल्यापासून आपल्या जवळच्या मतदारकेंद्रावर रांग लावून उभा होता. सर्वसामान्य जनता असो किंवा बॉलिवूड कलाकार, राजकारणी, उद्योगपती, क्रिकेटपटू असो.. अशा विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मतदान करून भारताचे सशक्त नागरिक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी मुंबईतील वांद्रेस्थित मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. रेखा यांच्याव्यतिरिक्त अभिनेता अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी देखील मतदान केले. याशिवाय मतदार यादीत नाव नसल्याने गुणी अभिनेता अतुल कुलकर्णीला लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हेत. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे नाव मतदारयादीत असल्याने त्याने मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच अमोल पालेकर, राहुल बोस, केदार शिंद, मधुगंधा कुलकर्णी, किरण खेर, सिंकदर खेर, आर.माधवन सपत्नीक, अभिनेत्री भाग्यश्री, स्वप्नील जोशी, शाहरूख खान, जावेद अख्तर, दीपिका पादुकोन, रोहिणी यांच्यासह अनेक हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच जावेद अख्तर, दीपिका पादुकोन, महेश भट्ट, रोहिणी हट्टंगडी यांनी विविध क्षेत्रातील लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment