शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साबीर शेख यांचे निधन

sabir-shaikh
मुंबई – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साबीर शेख यांचे निधन झाले असून साबीर शेख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. याच आजाराने त्यांची अखेर प्राणज्योत मालवली आहे. ऐन निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच साबीर शेख यांचे दुखःद निधन झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून नुकतेच शिवसेनेत आलेले हाजी अराफत शेख यांचे काका असलेले साबीर शेख हे काही दिवसांपासून अंथरूणाला खिळूनच होते. त्यातच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. युतीची सत्ता असताना आणि मनोहर जोशी आणि नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना साबीर शेख यांनी मंत्री पद भुषविले आहे.

Leave a Comment