गडचिरोलीत मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांचा गोळीबार

naxlite
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली मतदान केंद्रावर विधानसभेसाठी मतदान सुरु असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारानंतर काही काळ तेथील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र पोलिस बंदोबस्तात पुन्हा मतदान सुरु झाले.

बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून गडचिरोलीमध्ये मतदानाला सुरुवात झाली. मतदान शांततेत पार पडत होते. यावेळी ताडपल्ली मतदान केंद्रावर मतदानादरम्यान एक संशियत इसम तेथील परिसरात आला. त्या इसमाच्या हालचालीवरुन तो नक्षलवादी असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र पोलिसांच्या तावडीतून तो जंगलात पळून गेला. यावेळी जंगलात दबा धरुन बसेलेल्या नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राजवळील पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांकडूनही या गोळीबारास चोख प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.

Leave a Comment