झुकेरबर्गने केली इबोलाशी लढा देण्यासाठी २५ दशलक्ष डॉलर्सची मदत

mark
लंडन – इबोलाचा प्रसार रोखण्यासाठी आणि इबोलाग्रस्त नागरिकांच्या उपचाराकरिता फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसक्ला यांनी अमेरिकेतील केंद्रांना २५ दशलक्ष डॉलर्स मदत देण्याची जाहिर केली आहे. समूह संपर्क माध्यमांवर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी फेसबूक या समूह संपर्क माध्यमावर लिहिले आहे की, इबोला या आजाराचा प्रसार सर्व देशांमध्ये होत आहे. एचआयव्ही आणि पोलियोप्रमाणे हा आजार विश्वव्यापी होत चालला आहे. आम्ही देत असलेला निधी या क्षेत्रात काम करत असलेल्या संशोधकांच्या कार्याला चालना देण्यास मदत करेल, असे त्यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, इबोलाचा प्रसार वेगाने होत असून, आतापर्यंत या रोगामुळे ४,४४७ नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मृतांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचा सर्वाधिक प्रमाणात समावेश आहे.

झुकेरबर्ग म्हणाला की, इबोलाच्या विषाणूचा वेगाने प्रसार होत आहे. यामुळे आतापर्यंत ८४०० नागरिक प्रभावित झाले आहेत. या रोगावर आतापर्यंत ठोस उपचारपद्धती सापडलेली नाही. ज्या पद्धतीने या रोगाचा प्रसार होत आहे. त्यावरुन असे वाटते की, लवकरच हा रोग लाखो लोकांना आपल्या विळख्यात घेईल. आम्ही केलेले दान त्या लोकांकरिता आहे, जे या आजारातून लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही आशा करतो की, आम्ही दिलेल्या दानामुळे लोकांचे प्राण वाचतील, असे त्याने म्हटले आहे.

Leave a Comment