पाकिस्तानातील आत्मघातकी स्फोटात पाच ठार

blast
इस्लामाबाद – अफगाणिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या पाकिस्तानातील एका परिसरात आज आत्मघातकी हल्ला करण्यात आला. शांती समितीच्या बैठकीदरम्यान करण्यात आलेल्या या हल्ल्यात पाचजण ठार झाले आहेत. तर अन्य सातजण जखमी झाले आहेत, असे सूत्रांकडून समजते. सुदूर तिराह खो-यातील पीर मेला परिसरात आत्मघातकी हल्लेखोराने शांती समितीच्या सदस्यांना लक्ष्य़ केले. एका सुरक्षा अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, शांती समितीच्या बैठकीदरम्यान एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून घेतले. या स्फोटात पाचजण ठार झाले आहेत. तर अन्य सातजण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अद्यापपर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment