ग्राहम गूचने पीटरसनच्या आरोपांना फेटाळले

gouch
लंडन – इंग्लंडचा खेळाडू केविन पीटरसनच्या आत्मकथेतून सुरु झालेला विवाद अद्यापही सुरु आहे. आपल्या आत्मकथेत पीटरसनने इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंवर गंभीर आरोप लावले आहेत. पीटरसनच्या आरोपांना फेटाळून इंग्लंडचा माजी कर्णधार ग्राहम गूचने इंग्लंड संघाला याप्रकरणी आपली चुप्पी तोडण्यासाठी सांगितले आहे. गूचने केविन पीटरसनच्या विवादित आत्मकथेत माजी प्रशिक्षक एंडी फ्लॉवर आणि यष्टीरक्षक मॅट प्रायरबाबत लिहिलेल्या गोष्टी फेटाळत एलेस्टेयर कुकच्या नेतृत्वात इंग्लंड संघाला याप्रकरणी आपली चुप्पी तोडण्यासाठी सांगितले आहे. गूचने डेली टेलीग्राफ वर्तमानपत्रात लिहिले की, केविन पीटरसन आपली बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र आहे. तो इंग्लंडसाठी सामना विजेता राहिला आहे. त्याने लिहिलेले विधान वाचून मी दु:खी आहे. त्याने फ्लॉवर यांना इंग्लंड संघाचा सूत्रधार असल्याचे देखील सांगितले आहे. फ्लॉवर यांच्या कार्यकाळात इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या गूच यांनी सांगितले की, त्यांनी वार्इट परिस्थितीत संघात आत्मविश्वास भरला. त्यांनी प्रशिक्षक म्हणून चांगली जबाबदारी पार पाडली, असेही तो पुढे म्हणाला.

Leave a Comment