इराकमध्ये आत्मघाती कार बॉम्ब हल्ल्यात २५ ठार

attack
बगदाद – इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील कारमिया परिसरात दोन आत्मघाती कार बॉम्ब हल्ल्यात एका खासदारासह २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. शिया समुदायाच्या धार्मिक स्थळात प्रवेश करण्यासाठी उभ्या असलेल्या एका कारमध्ये दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये राजकीय पक्षातील एक सदस्य आणि एका मंत्र्याचा मृत्यू झाला आहे. यासह पाच पोलीस अधिकारी देखील यामध्ये ठार झाले आहेत. कारमिया परिसरात आईसीसच्या अतिरेक्यांकडून करण्यात आलेला हा तीसरा हल्ला असून या ठिकाणी सर्वाधिक हल्ले करण्यात आले आहेत. या परिसरात आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात एकूण ७७ जण ठार झाले आहेत.

Leave a Comment