अखेरच्या सामन्यासाठी १८ हजार तिकिटांची होणार विक्री

cricket1
कोलकाता – र्इडन गार्डनवर भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात २० ऑक्टोबरला होणा-या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यासाठी १८ हजार तिकिटे विकण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. बंगाल क्रिकेट संघ (कॅब) च्या सदस्यांमध्ये सुरु झालेल्या दोन दिवसाच्या तिकिट वितरणानंतर १५ ऑक्टोबरपासून तिकिटांची खिडक्यांवर विक्री सुरु होर्इल. ही तिकिटे स्पोर्टिंग टेंटमध्ये १८ ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील. कॅबच्या अधिका-यांनी सांगितले की, पहिले आठ ते नऊ हजार तिकिटे खिडक्यांवर विकली जात होती. मात्र, यावेळी आम्ही उपलब्ध तिकिटांची संख्या जवळपास दुपटीने वाढविली आहे. र्इडनची अधिकृत क्षमता ६७ हजार प्रेक्षकांची आहे. कैबने तिकिटांची किंमत ५ हजार ते २० हजार रूपयांपर्यंत ठेवली आहे.

Leave a Comment