माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रेमजी इन्व्हेस्टची ३५० कोटींची गुंतवणूक

premji
बंगळुरू – विप्रोचे सर्वेसर्वा अझीझ प्रेमजी यांनी कौटुंबिक गुंतवणूक म्हणून बंगळुरू येथील संसाधने आणि तंत्रज्ञान असलेल्या फायनान्शिअल सॉफ्टवेअर ऍण्ड सिस्टिम्स या आस्थापनेत ३५० कोटी रुपये म्हणजे ५७ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करून प्रेमजी यांनी कंपनीच्या चेन्नई येथील मुख्यालयाच्या इमारतीसह एटीएम, विक्री टर्मिनल आणि मोबाइल तसेच इंटरनेट ग्राहकांचे हक्क देखील विकत घेतले आहेत. पुढील २४ महिन्यांत फायनान्शिअल सॉफ्टवेअर एँड सिस्टिमसच्या पुढील विकासाच्या प्रक्रियेत प्रेमजी लक्ष घालणार आहेत. वर्ष २०१५ पर्यंत कंपनीला ८५० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. २० वर्षे जुन्या एफएसएसला संसाधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीचा उद्योग समजला जाते. एफएसएसचे जाळे सात हजार शहरांमध्ये असून सात दशलक्ष व्यवहार दररोज कंपनीकडून केले जातात. पुढील पाच वर्षांत कंपनीचे २,२०० कोटी रुपये महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. प्रेमजी इन्व्हेस्टच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याबाबत कंपनीने म्हटले आहे की, ही गुंतवणूक केल्यानंतर एफएसएसमध्ये अद्यावतीकरण करण्यासाठी आउटसोर्सिंगचा पर्याय उपलब्ध आहे. प्रेमजी इन्व्हेस्ट यासाठी खासगी आणि सार्वजनिक समभाग विक्री करणार असून कंपनीचा व्यवहार भारत, चीन आणि अमेरिका या देशांमध्ये देखील विस्तारणार आहे. १६०० कर्मचारी सध्या कंपनीसोबत काम करत असून ते उत्तर अमेरिका, मध्य-पूर्व आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक देशांमध्ये काम करतात.

Leave a Comment