२० ऑक्टोबरला आयपीएलच्या ८ व्या सत्राची घोषणा

ipl
कोलकाता – इंडियन प्रिमियर लीगच्या आठव्या सत्राच्या कार्यक्रमाची घोषणा २० ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. संचालन परिषदेची बैठक २० ऑक्टोबरला होर्इल, ज्याच्यात आयपीएलच्या कार्यक्रमाची घोषणा होर्इल. ही बैठक भारत आणि वेस्टइंडिजच्या अखेरच्या सामन्यापूर्वी होर्इल. कोलकाता नार्इट राइडर्सचा संघ आयपीएलचा गतविजेता आहे आणि अशातच कोलकाताला पुन्हा एकदा उद्घाटन समारोहाचे यजमानपद मिळू शकते. उद्घाटन समारोह युवा भारती क्रीडांगणमध्ये होऊ शकतो, जेथे आयएसएलचा भव्य शुभारंभ पार पडला होता. कैबचे संयुक्त सचिव आणि आयपीएलच्या संचालन परिषदेचे सदस्य सुबीर गांगुली यांनी सांगितले की, आम्ही बैठकीत स्थळाबाबत अंतिम निर्णय घेऊ. निश्चितच सॉल्ट लेक स्टेडियमबाबत आम्ही विचार केला आहे. मात्र, आम्ही अन्य पर्यायांवर देखील विचार करू. आयपीएलची पुढील स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणा-या आयसीसी विश्वचषकानंतर होर्इल.

Leave a Comment