सुवर्ण पदकांची हॅट्रिक पूर्ण करण्याचे योगेश्वरचे लक्ष्य

yogeshwar
नवी दिल्ली – आशियार्इ खेळात सुवर्ण पदक जिंकणारा कुस्तीगीर योगेश्वर दत्त आता रियो ऑलंपिकपर्यंत सुवर्ण पदकांची हॅट्रिक पूर्ण कण्याचे लक्ष्य समोर ठेवून सराव करत आहे. योगेश्वरने इंचियोन आशियार्इ खेळात ६५ किग्री वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले, जे १९८६ नंतर एखाद्या भारतीय कुस्तीगीराने उपखंडात जिंकलेले पहिले पिवळे पदक आहे. त्याच्याआधी पहिल्या आशियार्इ खेळात करतार सिंहने सुवर्ण पदक जिंकले होते. योगेश्वरचे लक्ष्य आता पुढीलवर्षी जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून ऑलंपिक खेळासाठी पात्र होणे आणि पुन्हा रियो ऑलंपिकमध्ये देखील पिवळे पदक जिंकणे आहे. लंडन ऑलंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणा-या योगेश्वरने सांगितले की, मी आता केवळ रियो ऑलंपिकसाठी सराव करत आहे. मला पुढीलवर्षी जागतिक स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे आणि मी तेथे सुवर्ण पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर रियो ऑलंपिकमध्ये देखील आपल्या पदकाचा रंग बदलण्याचा प्रयत्न करीन. तो पुढे म्हणाला की, मी तीन सुवर्ण पदकांना आपले लक्ष्य बनविले होते. त्यातील पहिल्या लक्ष्याला मी गाठले आहे. आता मी आपल्या कमजोरीवर लक्ष केंद्रीत करणार आहे, असेही तो पुढे म्हणाला.

Leave a Comment