सचिन-द्रविड खेळणार पाकिस्तानातील प्रदर्शनी सामन्यात!

sachin1
इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पाकिस्तानमध्ये पुन्हापासून सुरु करण्याच्या प्रयत्नात असलेले पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी संकेत दिले आहेत की, दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड प्रदर्शनी सामन्यासाठी पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता आहे. मार्च २००९ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकाही विदेशी संघाने दौरा केला नाही. शहरयार यांनी एका आंतरराष्ट्रीय मिडियाशी बोलताना सांगितले की, मी नुकताच माजी भारतीय क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांना भेटलो होतो. त्यांनी मला पाकिस्तानात एक प्रदर्शनी सामना खेळविण्यासाठी मदत करण्याचा विश्वास दिला होता. शहरयार यांनी सांगितले की, बेदी मला भेटायला आहे आणि त्यांनी सांगितले की, ते सध्याचा भारतीय संघ आणि निवृत्त झालेले सचिन-द्रविड यांची प्रदर्शनी सामन्यात खेळण्यासाठी मनधरणी करू शकतो. यावर्षी एप्रिलमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांसोबत मालिका खेळण्यासाठी तयार झाले आहेत. त्यातील २०१५ ते २०२३ यादरम्यान चार मालिका पाकिस्तान आयोजित करेल. पाकिस्तानच्या यजमानपदात भारत दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी २० सामना युएर्इमध्ये वर्ष २०१५ मध्ये खेळेल.

Leave a Comment