संयुक्त राष्ट्रसंघाने केले जम्मू काश्मिर पोलीस दलातील शक्तीदेवींना सन्मानित

uno1
संयुक्त राष्ट्रसंघ – जम्मू काश्मिर पोलीस दलातील अधिकारी शक्तीदेवी यांना संयुक्त राष्ट्रसंघाने सन्मानित केले आहे. शक्तीदेवींना अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेत केलेल्या असाधारण कामगिरीकरिता आणि लैंगिकतेवर आधारित हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या पिडितांची मदत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरिता त्यांना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शक्तीदेवी सध्या अफगाणिस्तानात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेत कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पोलीस शाखेने न्यूयॉर्कस्थित भारतीय मिशनला पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, देवी यांना अफगाणिस्तानातील विविध परिसरात केलेल्या असाधारण कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.