जागतिक अंधदिनी करा डोळसपणे मतदान

voting
मुंबई – १५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात अंध दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अंधांच्या समस्या आणि समाजाकडून त्यांच्या अपेक्षा यासर्वबाबींवर प्रकाश टाकण्यात येतो.परंतु यंदा अंध दिन आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका असा भन्नाट योगायोग जुळून आला आहे. गेली १५ वर्ष डोळ्याला काळी पट्टी बांधून मतदान करणार्‍या मतदारांना यावेळी निवडणुकीत डोळसपणेच मतदान करावे. इतरांचे ऐकून किंवा जाहिरातबाजीला बळी पडून मतदान करण्याऐवजी आपल्या सद्विवेकबुद्धीने मतदान करायला हवे,जर असे डोळसपणे मतदान झाले तरच या राज्यात खर्‍या अर्थाने सुराज्य अवतरेल… हे निश्चित.

निवडणुकांच्या तोंडावर युती आणि आघाडी तुटल्याने सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुक लढवित असून प्रत्येक जण आपली क्षमता तपासू लागला आहे. त्यामुळे यंदा प्रत्येक मतदारसंघातून एक किंवा दोन उमेदवार नसून चौरंगी,पंचरंगी लढत पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेस असो वा भाजप आणि शिवसेना असो वा राष्ट्रवादी किंवा मनसे असो सर्व पक् षमतदारांना आवाहन करून निवडणुक देण्याबाबत विनंती करत आहेत.पैशांचा आमिष दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु मतदारांनो,या सर्व आमिषांना बळी न पडता या पैशांमध्ये तुमच्या एका मतांची किंमत लाखो रुपयांची आहे. हे राजकीय मंडळींना ठाऊक असून ती मताची किंमत लावत आहेत. त्यामुळे आपले मत हे अमुल्य असून ते केवळ विकास कामांना द्यायला हवे. विकासाची स्वप्ने दाखविणार्‍या आमदारावर विश्वास ठेवू नका, कारण ती केवळ निवडणूक जिंकेपर्यंतची स्वप्नेच असतात. हे विसरता कामा नये. त्यामुळे १५ऑक्टोबर हा जागतिक अंध दिन असल्याने डोळे उघडे ठेवून मतदानाचा हक्क बजावणे प्रत्येक मतदारांचे कर्तव्य आहे.

Leave a Comment