भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून सहा लाख रुपये जप्त

bjp
मुंबई – भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या शिवसंग्राम संघटनेच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्या प्रचार कार्यालयात जवळपास सहा लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. लव्हेकर या मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रात उद्या २८८ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने विविध भागातील उमेदवारांच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. या दरम्यान लव्हेकर यांच्या कार्यालयावर देखील छापा टाकल्यानंतर ही रक्कम आढळून आली. दरम्यान शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी ही रक्कम वाटपासाठी आणली नसून रॅलीतील गाड्यांचे भाडे देण्यासाठी आणली असल्याले सांगितले. मात्र आंबोली पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी पंचनामा करून पैसे जप्त केले आहे.

Leave a Comment