बांगलादेशी विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

governer
मुंबई – भारत आणि बांगलादेशामधील आंतरराष्ट्रीय युवक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या १०० युवकांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताने दिलेल्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करताना विद्यार्थी देवाण-घेवाण तसेच तंत्रज्ञान देवाणघेवाणीच्या माध्यमातून भारत व बांगलादेशातील युवक परस्परांच्या जवळ येतील, अशी भावना बांगलादेशी शिष्टमंडळाच्‍या प्रमुख युवतीने व्यक्त केली.आपल्या मुंबई भेटी दरम्यान बांगलादेशातील युवक मुंबई शेअर बाजार, गेट वे ऑफ इंडिया, टाटा समाज विज्ञान संस्था तसेच इतर विविध ठिकाणी भेट देणार आहेत. भारत सरकारच्या कौशल्य विकास, उपक्रमशिलता, युवक व क्रीडा मंत्रालयाने ही भेट आयोजित केली आहे.

Leave a Comment