गहिवरल्या वातावरणात ‘वनराई’च्या आधारवडला श्रद्धांजली

mohan-dharia
पुणे – डॉ. मोहन धारिया यांच्या अनेक आठवणी जाग्या करतत्यांचा पहिला स्मृतीदिन त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत पार पडला. स्वातंत्र्य लढ्याचे निर्माण असलेले अण्णा, तडफदार राजस व्यक्तिमत्व तरीही सात्विक अंतरंग, समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या तीन भागातील जीवनाचा आलेख, इंदिरा गांधींच्या काळात नाकारलेले उपनेत्याचे पद, खेड्यांकडे परत चला हा नारा, पर्यावरणसंवर्धनाची ज्योती पेटवणारे धारिया,संत विद्यापीठासाठी घेतलेला पुढाकार, परदेशी लोकांना बोलवून सादर केलेली दिवाळी, रक्षाबंधन, प्रसंगी मुख्यमंत्र्यालाही भेटीची वेळ टाळल्याने ‘वनराईत’ येवून भेटा असे सांगणारे अण्णामात्र त्यांच्याच नव्हते याचा शोक सर्वांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. धारिया यांनी लिहिलेल्या ‘तेथे कर माझे जुळती’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सर्वांनी डॉ.मोहन धारिया यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.शंकर अभ्यंकर म्हणाले, अण्णा हे अजातशस्त्रू होते. ते देहाने जरी आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा आपल्यातच आहेत. धर्म, राजकारण, साहित्य या प्रत्येक क्षेत्रातील लोकांशी त्यांचा संपर्क होता. वनराईचे संपादक म्हणूनही त्यांनी अतिशय योग्य भूमिका घेऊन काम केले. मुजूमदार म्हणाले, धारिया यांना जीवनपट समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या तीन विभागांत विभागलेले आहे. कोणत्याही एका व्यक्तीला एका आयुष्यात अशा तीन पातळीवर जगणे कठीण आहे. मात्र, त्यांनाच ते शक्य झाले. एस.के.कुलकर्णी म्हणाले, अण्णांना श्रद्धांजली वाहने ही अवघड गोष्ट आहे. ते एकाच जीवनात अनेक आयुष्य जगले. चळवळी, स्वातंत्र्याचा लढा आणि संघर्षमय जीवन असा त्यांचा प्रवास. दुसर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे. गांधीजींना नंतर ‘पुन्हा खेड्यांकडे चला’ हा नारा त्यांनी दिला. मात्र त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. ‘वनराई’च त्यांचे खर्‍या अर्थाने स्मृतीस्थळ झाले.उल्हास पवार म्हणाले, काँगेस सेवा दलात काम करत असल्यापासून अण्णांशी माझा संबध आला. त्यांच्या आठवणी अनेक असून प्रेरणादायी आहेत. दलित, अनाथ, अपेक्षितांचे प्रश्न सोडवणे त्यांचे पुनरुत्थान करणे हे त्यांच्या आयुष्याचे व्रत होते. तसेच यंदा पंचरंगी निवडणूक होत असताना त्यांची अधिक आठवण येते. छोट्या-छोट्या गोष्टींत मदत करणारे असे अण्णा होते, असेही ते म्हणाले. सतिश देसाई म्हणाले, साहित्य संमेलनाच्या काळात राज्य शासनाच्या निधी वरून झालेल्या वादामुळे अस्वस्थ असतानांना अण्णांनी आधार दिली. कोणतीही गोष्ट त्यांना सांगावी आणि निर्धास्थ व्हावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांची उणीव नेहमी जाणवेल .तर दिपक टिळक म्हणाले, आचार, विचार आणि उच्चार या तिन्हीचा संगम असलेला हा माणूस पर्यावरण प्रेमी ही होता. त्यांच्यामुळे अनेकांच्या मनात पर्यावरण संरक्षणाची ज्योत पेटली गेली.