तीन बडया उमेदवारांना ‘पेड न्यूज’प्रकरणी नोटीस

trio
उस्मानाबाद : निवडणूक आयोगाने ‘पेड न्यूज’ प्रकरणी उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाच्या तीन दिग्गज नेत्यांना नोटीस बजावली असून, आपले म्हणणे दोन दिवसात मांडण्याचे आदेश दिले आहेत.

ही नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील, भाजपाचे संजय दुधगावकर आणि शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना बजावण्यात आली असून या तीनही उमेदवारांनी स्थानिक मराठी वृत्तपत्रात पेड न्यूज दिल्या होत्या. यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या जिल्हा माहिती केंद्राने वृत्तपत्रात या उमदेवारासंबंधित प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर आक्षेप नोंदवला. या बातम्यांमुळे पक्षाला आणि उमेदवाराला फायदा होत असल्याचा ठपका ठेवत आयोगाने राणा जगजितसिंह, दुधगावकर आणि निंबाळकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, दोन दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment