ज्यॉ तिरोले यांना अर्थशास्त्राचे नोबेल

nobel
स्टॉकहोम – यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल फ्रेंच अर्थतज्ज्ञ ज्यॉ तिरोले यांना जाहीर झाले असून मार्केट आणि नियामक संस्थांबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाबाबत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

१९८० नंतर ज्यॉ तिरोले यांनी मार्केट यंत्रणा अपयशी का ठरतात यावर नवीन संशोधन सुरू केले. कंपन्यांच्या एकाधिकारशाहीला सरकार कसे नियंत्रित करू शकते यावर त्यांनी धोरणात्मक चौकट तयार केली. दूरसंपर्क कंपन्यांपासून बॅँकिंगपर्यंत सर्वच उद्योग हे नियंत्रित केले जाऊ शकतात, हे त्यांनी संशोधन लेख आणि पुस्तकांद्वारे मांडले.

२०१४ मधील वैद्यक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांततेचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार १० डिसेंबर रोजी प्रदान केले जाणार आहेत.

Leave a Comment