काश्मिरप्रश्नी अमेरिकेचा हस्तक्षेप करण्यास नकार

uno
संयुक्त राष्ट्र – काश्मिर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करावा, ही पाकिस्तानची मागणी अमेरिकेने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. काश्मिर मुद्यावर राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून काश्मिरचा वाद हा भारत-पाकिस्तानने स्वत:हून चर्चेच्या माध्यमातून सोडवाण्याचा सल्ला संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. त्यामुळे काश्मिरप्रश्नी पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांनी भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या तणावाबाबत संयुक्त राष्ट्राचे सचिव बान-की-मून यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. पाकिस्तानने या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून काश्मिर सीमावाद हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावले. बान-की-मून यांना लिहिलेल्या पत्रात पाकिस्तानने काश्मिर समस्येचा मुद्दा शांतीपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या कार्यालयाची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment