अमेरिकेत आढळला इबोलाचा दुसरा रुग्ण

ebola
न्युयॉर्क – अमेरिकेत इबोलाची लागण झालेला दुसरा रुग्ण आढळला आहे. हा टेक्सासच्या डलासमध्ये आरोग्याची देखरेख करणारा कर्मचारी आहे. अमेरिकेतील पहिल्या लागण झालेल्या थॉमस एरिक डंकन यांच्या आरोग्याची देखरेख यांनीच केली होती. शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान त्यांना ताप आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आलेल्या तपासणी परिणामात त्यांना इबोलाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. टेक्सास आरोग्य आयुक्त डॉ. डेविड लेक यांनी सांगितले की, अमेरिकेत इबोलाचा हा दुसरा रुग्ण आढळला असून रोगाची लागण थांबवता यावी म्हणून उपाययोजना सुरु आहेत. इबोलाची लागण झालेल्या थॉमस एरिक डंकन या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment