रॅम्पवर अवतरली सानिया

sania
नवी दिल्ली – टेनिस स्टार सानिया मिर्झा आज एका वेगळ्याच विश्वात रमलेली दिसली. ‘विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीक स्प्रिंग समर २०१५’ मध्ये डिझायनर रितू पांडे च्या शो स्टॉपर च्या रूपात झळकलेल्या सानियाने सफेद गाउन परिधान करून जिन्सच्या नविन श्रेणीतील कपड्यांचे देखील प्रदर्शन केले होते. मोकळ्या केसातील सानियाच्या कर्णफुलांनी तिच्या सौंदर्यात भर घातली होती. शो संपल्यानंतर तिने सांगितले की, रॅम्पवर चालणे मजेदार होते. मी एक वर्षानंतर रॅम्पवर चालले. कोणत्याही सामान्य मुलीप्रमाणे मलाही फॅशन करायला आवडते. मला आरामदायक कपडे आवतात अणि विशेष प्रसंगी ड्रेसअप करण्याची मला आवड आहे. टेनिस खेळाडू असलेली सानिया सध्या क्रेकटर असलेला पति शोएब मलिक यांच्यासोबत बॉलिवुड पार्ट्यांमध्ये देखील हजेरी लावते आहे. बॉलिवुडमध्ये करियर करण्याचा विचार आहे का? या प्रश्नावर तिने बलिवुड माझ्यासाठी योग्य जागा नव्हे मात्र, मला सिनेमे पहायला आवडतात असे तिने सांगितले.

Leave a Comment