निवडणुकीनंतर दोन्ही सेना एकत्र येण्याचे शर्मिला ठाकरे यांचे संकेत

sharmila
मुंबई – विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी आवश्यकता वाटल्यास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, असे खुद्द राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्र एकहाती जिंकता येईल. दुसऱ्या कोणत्याही पक्षांना मतदान होणार नाही, असा विश्वासही शालिनी ठाकरेंनी व्यक्त केला. तसेच निवडणुकीच्या आधीच राज-उद्धव एकत्र यायला हवे होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

२५ वर्षांची शिवसेना-भाजप युती सत्तेच्या हव्यासापोटी भाजपने तोडल्याने ही गोष्ट तमाम मराठी मतदार आणि राज- उद्धव यांच्या जिव्हारी लागली. या पार्श्‍वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी रात्री जेव्हा युती तुटली, तेव्हा राज- उद्धव यांच्यात शिवसेना- मनसे एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. मात्र, निवडणुकीचे अर्ज भरण्यास अगदी काही तासांचाच अवधी शिल्लक असल्याने तांत्रिकदृष्ट्या युती होऊ शकली नाही.आम्ही महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करतो. सेना-मनसे एकत्र येण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच ठरवतील. पण आमच्या मनात महाराष्ट्राचे हित आहे. हे दोघे एकत्र आले, तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता येईल. दुसऱ्या कोणत्याही पक्षांना मतदान होणार नाही. पण ते कळले असते, तर याच निवडणुकीत झाले असते. मात्र निवडणुकीनंतरही हे होऊ शकते. चांगले पक्ष जर आम्हाला मदतीचा हात पुढे करत असतील, तर आम्ही तो नक्कीच हातात घेऊ”, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Leave a Comment